चंद्रपूर भाजप महानगर कार्यकारिणीत मोठे फेरबदल; राशीद हुसेन यांच्याकडे अल्पसंख्याक सेलची धुरा , तर अमोल शेंडे कोषाध्यक्षपदी

33
Oplus_0

भारतीय जनता पक्षाच्या चंद्रपूर महानगर कार्यकारिणीत नुकतेच महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले असून, काही दिवसांपूर्वी महानगराध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलेले सुभाष कासनगोटूवार यांनी नवीन कार्यकारिणीची घोषणा केली आहे.या नव्या कार्यकारिणीत, आमदार किशोर जोरगेवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे राशीद हुसेन यांची अल्पसंख्याक सेलच्या शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तसेच, आमदार जोरगेवार यांच्या विश्वासातील कार्यकर्ते अमोल शेंडे यांच्याकडे कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
राशीद हुसेन आणि अमोल शेंडे हे दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून आमदार जोरगेवार यांच्यासोबत सक्रियपणे कार्यरत असून, ‘यंग चांदा ब्रिगेड’च्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
विशेषतः 2024 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान आमदार जोरगेवार यांच्या विजयासाठी या दोघांनी विशेष मेहनत घेतली होती. त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांच्यावर आता पक्षांतर्गत महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.या निवडीमुळे चंद्रपूर महानगर भाजपमध्ये नवे नेतृत्व उदयाला येत असून, पक्ष संघटन अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

bottom