कायमच वादग्रस्त ठरणारे दुर्गापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप एकाडे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी एकाडे यांच्या वागणुकीबाबत गंभीर आरोप केले असून, त्यांच्या वागणुकीत दमदाटी, हुकूमशाही आणि कर्मचाऱ्यांप्रती अपमानास्पद वर्तन असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ठाण्यातील पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणात नाराज असल्याचे समजते.एकाडे यांच्यावरील वाद हा नवीन नाही. यापूर्वी कोरपणा पोलीस स्टेशनमध्ये असतानाही त्यांनी अशाच प्रकारची वर्तणूक दाखवली होती. त्यावेळी अवैध व्यावसायिकांशी त्यांचे घनिष्ठ संबंध असल्याच्या चर्चा स्थानिकांत रंगल्या होत्या. याच कारणामुळे त्यांची बदली करण्यात आली होती. काही दिवस मुख्यालयात राहिल्यानंतर त्यांची पुन्हा दुर्गापूर येथे नियुक्ती झाली. मात्र, त्यांच्या वागणुकीत कोणताही बदल दिसून आला नाही, असे ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.सध्या दुर्गापूरमध्येही त्यांच्यावर अवैध व्यवसायिकांशी संगनमत आणि कर्मचाऱ्यांशी मनस्ताप निर्माण करण्याचे आरोप होत आहेत. या सर्व घडामोडींमुळे पोलीस ठाण्यातील वातावरण ढवळून निघाले असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून एकाडे यांच्यावर योग्य कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्याने अनाथ मुलाचे स्वप्न साकार; खुशाल गेडाम...
चंद्रपूर - मुल तालुक्यातील गोलाभुज येथील रहिवासी खुशाल सुरेश गेडाम यांच्या आयुष्यातील संघर्षाची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. लहान वयातच आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या या...
विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे अधिकृत उमेदवार अरुण लखाणी यांनी घेतले माता...
चंद्रपूर : महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक-2026 अंतर्गत वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने अरुण लखाणी यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली...
चंद्रपूर शहरातील रहमतनगरमध्ये सरकारी धान्याचा काळाबाजार?; पुरवठा विभागाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह
चंद्रपूर शहरातील रहमतनगर परिसरात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत (रेशन) मिळणाऱ्या सरकारी धान्याचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. शासनाकडून गरीब...
शिवनी चोर घाटावर रेती तस्करांचा धुमाकूळ; महसूल प्रशासनाची डोळेझाक, शासनाला कोट्यवधींचा...
चंद्रपूर शहरालगत असलेल्या शिवनी चोर रेती घाटावर सध्या रेती तस्करांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, या संपूर्ण प्रकाराकडे महसूल व पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत...
चंद्रपूर शहर में अवैध गैस रिफिलिंग का काला कारोबार , गैस...
देश में इन दिनों ईंधन की भारी कमी देखी जा रही है। घरेलू और व्यावसायिक गॅस सिलेंडर लोगों को समय पर उपलब्ध नहीं हो...












