चंद्रपूर बफर मामला रेंजमध्ये रेती व बांबू तस्करीला ऊत — वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह!

28

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील मामला बफर रेंज येथे नुकत्याच बदली होऊन आलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यकाळात रेती, बांबू आणि इतर अवैध व्यवसाय पुन्हा डोके वर काढत असल्याची गंभीर चर्चा सुरू आहे.
स्थानिक नागरिक आणि गावकऱ्यांच्या मते, या अधिकाऱ्यांनी पूर्वी चिचपल्ली वनपरिक्षेत्रात कार्यरत असताना तस्करांशी संगनमत करून वनसंपदेची लूट होऊ दिली होती. तेथील अनुभवावरूनच आता मामला रेंज परिसरातही तस्करीला प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप होत आहे.
त्यांच्या बदलीनंतर काही दिवसांतच परिसरात रेती तस्करी आणि बांबू वाहतुकीचे प्रमाण वाढले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि रोष व्यक्त केला जात आहे.
नागरिकांनी वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष घालून या सर्व प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. यावन परीक्षेच्या अधिकाऱ्यावर नियंत्रण न ठेवल्यास वनसंपदा आणि पर्यावरण या दोन्हीवर गंभीर परिणाम होऊ शकतात,” अशी भावना स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

bottom