चंद्रपूर शहरात आज बुरुड समाजातर्फे श्री केतेश्वर स्वामी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त सायंकाळी शहरातून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
मिरवणुकीत पारंपारिक वेशभूषेत बुरुड समाजातील बांधव व भगिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. ढोल, ताशे, अश्व तसेच विविध सांस्कृतिक देखावे या शोभायात्रेचे वैशिष्ट्य ठरले.
शहरातील भानापेट प्रभागात मिरवणुकीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
नाना दर्शनवार यांच्या पुढाकारातून मिरवणुकीत सहभागी झालेल्या समाज बांधव आणि भगिनींना शीतपेय वाटप करून त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
भव्य शोभायात्रेमुळे संपूर्ण चंद्रपूर शहर उत्साहात दुमदुमून निघाले.












