चंद्रपूर – नगरपरिषद निवडणूक निकालावर आमदार सुधीर मुनगंटीवार यांची ज्वलंत प्रतिक्रिया पक्षांतर गटबाजी व इतर विषयांवर ठेवला बोट

25

पवन झबाडे

चंद्रपूर जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले असून या निकालांमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप) ला मोठा धक्का बसल्याचे चित्र समोर आले आहे. बहुतेक नगरपरिषदांमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने भाजपची मोठी पिछेहाट झाली आहे.या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना भाजपचे ज्येष्ठ नेते व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षातील अंतर्गत परिस्थितीवर स्पष्ट शब्दांत भाष्य केले. पक्षातील काही नेत्यांच्या धोरणामुळे जिल्ह्यात भाजपमध्ये गटबाजीला पोषक वातावरण निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच पक्षात अनपेक्षित ‘इनकमिंग’ सुरू झाल्यामुळे जुने कार्यकर्ते अस्वस्थ झाल्याचे त्यांनी नमूद केले.मुनगंटीवार पुढे म्हणाले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने विदर्भात आपल्या नेत्यांना मोठी ताकद दिली, मात्र भाजपमध्ये काही माझ्यासह विदर्भामध्ये काही नेत्यांची ताकद कमी करण्यात आली. याचा थेट परिणाम कार्यकर्त्यांच्या आत्मविश्वासावर झाला आणि त्यामुळेच भाजपाला या निवडणुकांमध्ये मोठा फटका बसला.जिल्ह्यातील अंतर्गत गटबाजी हेच भाजपच्या पराभवामागील एक प्रमुख कारण असल्याचे मतही आमदार मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. या निकालांनंतर भाजपमध्ये आत्मपरीक्षणाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले

bottom