चंद्रपूर शहरातील एकोरी प्रभागातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या दीपा ललित कासट यांनी प्रचारात सध्या तरी आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. त्या थेट नागरिकांशी संवाद साधत असून त्यांच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
दीपा कासट या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून प्रभागातील मूलभूत समस्या, नागरी अडचणी व गरजा यांची त्यांना सखोल जाण आहे. सामाजिक कार्याच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांसाठी सदैव अग्रेसर राहिलेल्या कासट यांनी आता महानगरपालिकेच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे प्रश्न सोडवण्यासाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रभागातील प्रश्नांचा अभ्यास, नागरिकांच्या समस्या आणि विकासात्मक मुद्दे घेऊन त्या महानगरपालिकेत आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या प्रचारादरम्यान नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून कासट आणि नागरिकांमध्ये निर्माण झालेली आपुलकी व विश्वासाचे नाते विशेष लक्षवेधी ठरत आहे.
नागरिकांच्या थेट सहभागामुळे आणि सकारात्मक प्रतिसादामुळे दीपा ललित कासट यांचा प्रचार दिवसेंदिवस अधिक बळकट होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
.












