चंद्रपूर महानगरपालिकेच्या भानापेठ प्रभागातून संजय कंचरलावार हे मागील अनेक वर्षांपासून नगरसेवक म्हणून कार्यरत असून त्यांनी प्रभागात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली आहेत. मात्र सध्याच्या निवडणुकीत काही धनाड्य आणि असंतुष्ट घटकांकडून या विकासकामांना आळा घालण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे.
भानापेठ प्रभागातील निवडणुकीदरम्यान काही उमेदवारांकडून नागरिकांना पैशाचे प्रलोभन दिले जात आहेत. मात्र प्रभागातील नागरिक सजग असून त्यांनी विकासाला प्राधान्य देत पैशाच्या राजकारणाला नकार दिल्याचे दिसून येत आहे.
नागरिकांकडून संजय कंचरलावार यांनी आतापर्यंत केलेल्या विकासकामांची यादीच पुढे ठेवली जात आहे. प्रभागातील ग्रीन जिम, रस्ते, नाल्या, भूमिगत गटार व्यवस्था, वाचनालय, पथदिवे यांसारखी अनेक कामे संजय कंचरलावार यांनी वेगाने आणि प्रभावीपणे पूर्ण केली आहेत.
मात्र या विकासकामांमुळे काही असंतुष्टांना नाराजी असून ते पैशाच्या जोरावर विकासकामांना अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा दिसून येत आहे. तरीही या दुष्प्रचाराला जनतेकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसून, प्रभागातील वातावरण संजय कंचरलावार यांच्या बाजूने असल्याचे दिसत आहे.
यामुळे येणाऱ्या निवडणुकीत संजय कंचरलावार विजय संपादन करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.












