चंद्रपूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, सर्व स्तरातील, वयोगटातील मतदारांनी अधिकाधिक संख्येने मतदान करावे तसेच नवमतदार म्हणजेच युवा वर्गाचा यात मोठ्या प्रमाणात सहभाग वाढावा, यादृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे ‘तुमचे मत द्या आणि आकर्षक बक्षीसे जिंका’ ही स्पर्धाआयोजित करण्यात आली आहे.विशेष म्हणजे यात सहभाग घेऊन विजेत्या ठरणाऱ्या पहिल्या तीन मतदारांना अनुक्रमे मोटारसायकल, रेसिंग सायकल आणि मोबाईल मिळणार आहे. लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदान करून देशाच्या प्रगतीसाठी, ध्येयधोरणे ठरविण्यासाठी आपला सहभाग नोंदविणे अत्यंत महत्वाचे आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक १९ एप्रिल रोजी २११८ मतदान केंद्रावर होणार असून सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. १८ वर्षांवरील प्रथम मतदार मोठ्या संख्येने असल्याने व युवकांमध्ये मतदानाप्रती उत्साह निर्माण होण्यासाठी प्रशासनातर्फे स्वीप अंतर्गत अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे.१९ एप्रिल रोजी मतदान केल्यानंतर मतदारांनी शाई लावलेले बोट दाखवत मतदान केंद्रासमोर सेल्फी क्लिक करावा व आपला फोटो अपलोड करून ‘तुमचे मत द्या आणि आकर्षक बक्षीसे जिंका’ या स्पर्धेत सहभागी व्हावे. फोटो अपलोड करण्यासाठीची लिंक / क्यूआर कोड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://chanda.nic.in/en/divisions/collector-office-contact-details/ तसेच जिल्हा परिषदेच्या https://zpchandrapur.co.in/ वेबसाईटवर उपलब्ध आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्याने अनाथ मुलाचे स्वप्न साकार; खुशाल गेडाम...
चंद्रपूर - मुल तालुक्यातील गोलाभुज येथील रहिवासी खुशाल सुरेश गेडाम यांच्या आयुष्यातील संघर्षाची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. लहान वयातच आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या या...
विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे अधिकृत उमेदवार अरुण लखाणी यांनी घेतले माता...
चंद्रपूर : महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक-2026 अंतर्गत वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने अरुण लखाणी यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली...
चंद्रपूर शहरातील रहमतनगरमध्ये सरकारी धान्याचा काळाबाजार?; पुरवठा विभागाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह
चंद्रपूर शहरातील रहमतनगर परिसरात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत (रेशन) मिळणाऱ्या सरकारी धान्याचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. शासनाकडून गरीब...
शिवनी चोर घाटावर रेती तस्करांचा धुमाकूळ; महसूल प्रशासनाची डोळेझाक, शासनाला कोट्यवधींचा...
चंद्रपूर शहरालगत असलेल्या शिवनी चोर रेती घाटावर सध्या रेती तस्करांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, या संपूर्ण प्रकाराकडे महसूल व पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत...
चंद्रपूर शहर में अवैध गैस रिफिलिंग का काला कारोबार , गैस...
देश में इन दिनों ईंधन की भारी कमी देखी जा रही है। घरेलू और व्यावसायिक गॅस सिलेंडर लोगों को समय पर उपलब्ध नहीं हो...












