चंद्रपूर /नागभीड – 4 दिवसांपूर्वी विहिरीत पडलेल्या मादा बिबट्याचा मृतदेह आज बाहेर काढण्यात आला.
नागभीड वनपरिक्षेत्रातील मासली बिटात शेत शिवारात असलेल्या विहिरीत आज मादा बिबटचा मृतदेह आज आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी पोहचले.
सायगाता रोडवर लागून असलेल्या भैयाजी मानकर यांच्या शेतात असलेल्या विहिरीत सकाळी बिबट मृतावस्थेत आढळला, वनविभागाने बिबट्याचा मृतदेह बाहेर काढत, शवविच्छेदन केले असता सदर मादी बिबटचा मृत्यू 4 दिवस आधी झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला, शिकारीसाठी पाठलाग करीत असताना बिबट विहिरीत पडला असावा असा अंदाज यावेळी वनविभागाने लावला. मृतदेहाचे सर्व अवयव शाबूत होते.
बिबटचा मृतदेह घटनास्थळी जाळण्यात आला, यावेळी पशु विकास अधिकारी ममता वानखेडे, व वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
चंद्रपूर - मुल तालुक्यातील गोलाभुज येथील रहिवासी खुशाल सुरेश गेडाम यांच्या आयुष्यातील संघर्षाची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. लहान वयातच आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या या...
चंद्रपूर : महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक-2026 अंतर्गत वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने अरुण लखाणी यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली...
चंद्रपूर शहरातील रहमतनगर परिसरात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत (रेशन) मिळणाऱ्या सरकारी धान्याचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. शासनाकडून गरीब...
चंद्रपूर शहरालगत असलेल्या शिवनी चोर रेती घाटावर सध्या रेती तस्करांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, या संपूर्ण प्रकाराकडे महसूल व पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत...