लाडक्या खासदाराला निरोप देण्यासाठी हजारो नागरिक अंत्ययात्रेत झाले सहभागी

शेवटचा निरोप

2612

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनाने संपूर्ण राज्य हादरुन गेले, कारण सुद्धा तसेच मोदी लाटेविरोधात एकमात्र कांग्रेसचे खासदार म्हणून जिंकून येण्याचा मान धानोरकरांना मिळाला होता.

खासदार होताच चंद्रपूर जिल्ह्यातील कांग्रेस पक्षात जीव ओतण्याचे काम धानोरकर यांनी केले होते, मात्र 30 मे ला त्यांचं अकाली निधन झाले, निधनाची वार्ता मिळाल्यावर सर्वाना धक्का बसला.

31 मे ला लाडक्या खासदाराला निरोप देण्यासाठी हजारो नागरिक वरोरा शहरात दाखल झाले, कांग्रेस पक्षाचे अनेक दिग्गज नेते सुद्धा धानोरकर यांना निरोप देण्यासाठी आले.

बाळू धानोरकर अमर रहे अश्या घोषणा अश्रूपूर्ण नयनांनी नागरिकांनी दिल्या.

bottom