बियर शॅापीच्या नवा परवाना देण्यासाठी दीड लाखांची मागणी करणारे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक, दुय्यम निरीक्षक आणि कार्यालय अधिकक्ष लाच प्रकरणात अडकले. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेत एकच खळबळ उडाली असून पोलिस आणि महसूल यंत्रणाही सर्तक झाली आहे. सध्या कोणत्याही सामान्य माणसांना त्रास देवू नका , असे तोंडी आदेश वरिष्ठांनी दिले आहे. दरम्यान अधिक्षक संजय जयसिंगराव पाटील (वय ५४) फरार असून पोलिस पथक त्यांचा शोध घेत आहे. दुय्यम निरीक्षक चेतन माधवराव खारोडे (वय ३४) आणि कार्यालय अधिक्षक अभय बबनराव खताळ (वय ५३) या दोघांना काल मंगळवारला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. त्यांना आज न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील संजय पाटील अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाने नव्या दारु दुकानांना परवानगी देण्यासाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची वसूली केली आहे. दरम्यान लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आता आपल्या तपासाची कक्षा रुंदावली असून या कार्यालयातील आणखी काही अधिकारी त्यांच्या रडावर आहे.
———————————————
६४ कोटींची वसूली
एक एप्रिल २०१४ ला जिल्हयात संपूर्ण दारुबंदी लागू झाली. त्यानंतर मे २०२१ मध्ये उठविली. त्यावेळी शासनाने जारी केलेल्या अध्यादेशात बंदीपूर्वी असलेल्या सर्व प्रकारच्या दारु दुकानांना ‘जैसे थे’ परवानी देण्यात आली. याच काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे चंद्रपूर जिल्हा अधिक्षक म्हणून संजय जयसिंगराव पाटील रूजू झाले. त्यांच्या कार्यकाळात नव्या दारु दुकानांना परवाने वाटण्याचा एककलमी कार्यक्रम राबविण्यात आला. गत तीन वर्षात तब्बल नव्या चारशे बार अॅन्ड रेस्टारंटला जिल्ह्यात परवाने देण्यात आले. यासाठी प्रत्येकी १२ लाख रुपये घेण्यात आले. त्याशिवाय दहा नवीन वाॅईन शॅाप जिल्ह्यात आले. त्यासाठी प्रत्येकी ७० लाख रुपये या अधिकाऱ्यांनी उकळले. सोबतच जिल्ह्यात ४० नवे देशी दारुंची दुकान आली. त्यासाठी प्रत्येकी ४० लाख रुपये या अधिकाऱ्यांनी वसूल केले या सर्व प्रकरणात आतापर्यंत जवळपास ६४ कोटी रुपये वसूल करण्यात आले असल्याची माहीती सुत्रांनी दिली












