चंद्रपुरातील सराफा लाईन परिसरात युवकाने इमारतीवरून मारली उडी

शहराच्या मध्यभागी युवकाची आत्महत्या

1853

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या नेताजी नगर भवन च्या इमारती वरून एका युवकाने उडी मारली, या घटनेत युवकाचा मृत्यू झाला.

Shocking incident chandrapur
डॉक्टरांनी युवकाला मृत घोषित केले

2 जुलै ला सायंकाळी 7 ते 7.30 वाजेदरम्यान सराफा लाईन मधील महानगरपालिकेची इमारत नेताजी नगर भवन वरून एका 30 वर्षीय युवकाने उडी मारली, अचानक झालेल्या या घटनेमुळे नागरिक घाबरले, पोलिसांना तात्काळ नागरिकांनी सूचना दिली, युवकाला रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

रविवारचा दिवस असल्याने मार्केट परिसरात शांतता आते याचा फायदा घेत युवक त्या इमारतीच्या आत गेला असेल अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.

युवकाने आत्महत्या का केली, याबाबत चंद्रपूर शहर पोलीस अधिक तपास करीत असून सध्या युवकाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

bottom