चंद्रपूर ओफ्थाल्मिक सोसायटीचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न डॉ. संदीप मुनगंटीवार अध्यक्ष, तर डॉ. अमित मामीडवार सचिव पदी नियुक्त

39

चंद्रपूर ओफ्थाल्मिक सोसायटीचा पदग्रहण सोहळा दिनांक 15 जून 2025 रोजी हॉटेल सिद्धार्थ प्रीमियर येथे अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. यावेळी डॉ. संदीप मुनगंटीवार यांची अध्यक्षपदी, तर डॉ. अमित मामीडवार यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद नागपूर येथील ख्यातनाम नेत्रतज्ज्ञ डॉ. आशिष थूल यांनी भूषवले, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. निखिल कांडूरवार उपस्थित होते. चंद्रपूर शहरातील सर्व प्रमुख नेत्रतज्ज्ञ, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी तसेच नेत्र विभागप्रमुख डॉ. दिलीप कुमरे यांची उपस्थिती या सोहळ्याला लाभली. यावेळी आयएमए (IMA) चे अध्यक्ष डॉ. रितेश दीक्षित आणि सचिव डॉ. सुश्रुत भुक्ते यांनीही उपस्थित राहून नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. गतवर्षीचे अध्यक्ष डॉ. हर्ष मामीडवार आणि सचिव डॉ. भूषण उपलंचीवार यांनीही आपल्या शुभेच्छा देत नवीन कार्यकारिणीकडून अधिक परिणामकारक कार्य अपेक्षित असल्याचे सांगितले.
नवीन अध्यक्ष डॉ. संदीप मुनगंटीवार यांनी आपल्या मनोगतात, आगामी कार्यकाळात नेत्ररोग क्षेत्रातील ज्ञानवृद्धी करणारी व्याख्याने तसेच समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.कार्यक्रमाचे संयोजन आणि संचालन डॉ. प्रीती उराडे व डॉ. प्रियंका तलरेजा यांनी केले. आभारप्रदर्शन नवनियुक्त सचिव डॉ. अमित मामीडवार यांनी केले.

bottom