पारस नावाचा कुख्यात रेती तस्कर राजकीय आशीर्वादाच्या छायेखाली अधिकाऱ्यांना न जुमानता माजवतो थैमान

37

जिल्ह्यात सध्या बिनधास्तपणे सुरू असलेल्या अवैध रेती तस्करीमुळे प्रशासनाची कार्यक्षमता आणि कायद्याचा वचक यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेषत पिपरी परिसरातील पारस नावाचा कुख्यात रेती तस्कर यामध्ये प्रमुख सूत्रधार असल्याचे समोर येत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते पारस मागील अनेक वर्षांपासून अवैध रेती उत्खनन व वाहतुकीच्या व्यवसायात सक्रिय असून त्याच्या पाठिशी काही प्रभावशाली राजकीय नेत्यांचे आशीर्वाद असल्याचे उघडपणे बोलले जात आहे.चंद्रपूर शहरालगत असलेल्या काही गावांमधून मोठ्या प्रमाणावर रेतीची बेकायदेशीर वाहतूक होत असून, आयवा ट्रॅक्टर ने तस्करी करत हप्ता प्रणाली व अधिकार्‍यांवरील दबाव यांच्या माध्यमातून ही तस्करी उघड उघड सुरू आहे. अधिक चिंतेची बाब म्हणजे हा तस्कर आपल्या राजकीय संबंधांची खुलेआम मिजास मिरवत फिरतो आणि अनेक पदांवर आहे त्यामुळे मला कोण अडवणार असे सांगून अधिकाऱ्यांनाही जुमानत नाही.स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार पारसने रेती तस्करीसाठी आपली एक सुसज्ज यंत्रणा तयार केली असून जिल्ह्यातील विविध भागांमध्ये त्याच्या रेतीचे ट्रक आणि ट्रॅक्टर खुलेआम फिरताना दिसतात. महसूल आणि पोलिस प्रशासनाने अनेक वेळा तक्रारी मिळाल्या असतानाही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, ही बाब धक्कादायक आहे.
या पार्श्वभूमीवर पारस सारख्या दहशत माजवणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी राजकीय वरदहस्ताचा आडसांड न करता कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी अशी जोरदार मागणी जिल्ह्यातील जनतेकडून केली जात आहे.

bottom