चंद्रपूरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने मागितली राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी राजकीय हालचालींना वेग

26
Oplus_131072

चंद्रपूर मनपा निवडणुकीमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले; उमेदवारीसाठी रस्सीखेच, पक्षांतराला वेग
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांची नावे निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली असून काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांमध्ये उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनीही शहरातील मनपा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचणी प्रक्रिया सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने आज चंद्रपूर शहरात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
या मुलाखतीदरम्यान महानगरपालिकेचे चार माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडे उमेदवारीची मागणी केली. विशेष बाब म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष राशी हुसेन यांच्या पत्नी इस्मत राशीद हुसेन यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी करत मुलाखत दिली आहे.
राशी हुसेन हे आमदार किशोर जोरगेवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात असल्याने या घडामोडीमुळे भाजपच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
याशिवाय बहुजन समाज पक्षाचे प्रदीप दे, धनराज सावरकर, बंटी परचाके, तसेच माजी नगरसेविका नीलम अक्केवार यांचे पती सचिन अक्केवार यांनीही मुलाखती दिल्याचे समोर आले आहे. या घडामोडींमुळे शहरातील राजकारणात पक्षांतराला वेग आल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.
दरम्यान, येत्या काळात भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांतून उमेदवारी न मिळालेल्या कार्यकर्त्यांमधील नाराजी अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, त्यातून मोठ्या प्रमाणात पक्षांतर होण्याची चिन्हे दिसत आहेत.

bottom