श्री छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर विचार मंच पॅनल चे एकोरी प्रभागात प्रचारात वर्चस्व

23
Oplus_131072

चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस अधिकच वेग घेत असून, या प्रचारात श्री छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर विचार मंच पॅनल चे उमेदवार दीपा ललित कासट प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. पदयात्रा आणि कॉर्नर सभांच्या माध्यमातून त्यांनी प्रचाराला नवी धार दिली आहे.
आज दीपा कासट यांनी एकोरी प्रभागात पदयात्रा काढून श्री छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर विचार मंच पॅनल चे उमेदवारांसाठी नागरिकांकडे थेट मतदानाचे आवाहन केले. या पदयात्रेदरम्यान त्यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचना जाणून घेतल्या. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, घरपट्टे, आरोग्य सुविधा यासह विविध स्थानिक प्रश्नांवर त्यांनी चर्चा केली.
या पदयात्रेत दीपा कासट. तथागत पेटकर महेश बावणे यांच्यासह श्री छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर विचार मंच पॅनल चे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वॉर्डातील मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. दुपारी सुरू झालेली ही पदयात्रा संपूर्ण एकोरी प्रभाग पोहोचली.
पदयात्रेदरम्यान विविध ठिकाणी छोट्या कॉर्नर सभांचे आयोजन करण्यात आले होते. या सभांमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर विचार मंच पॅनल चे विकासात्मक योजनांची माहिती देत, त्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मिळालेला पाठिंबा पाहता प्रचाराला निश्चितच बळ मिळाल्याचे चित्र दिसून आले.
पदयात्रा च्या माध्यमातून चंद्रपूर शहरातील एकोरी प्रभागातील सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार श्री छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर विचार मंच पॅनल चे उमेदवार दीपा कासट. तथागत पेटकर महेश बावणे यांनी व्यक्त केला.

bottom