व्यावसायिक ते समाजसेवक ते आमदाराचे सीव्हीय सहायक ते आता थेट राजकारणात सक्रिय झालेले ललित कासट यांनी पत्नी दीपा ललित कासट यांना प्रभाग क्रमांक 10 क मधून श्री छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर विचार मंच पॅनल कडून निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे
सर्वसाधारण महिला गटातून त्यांची उमेदवारी आहे
मागील खूप दिवसापासून समाज कार्यात सक्रिय असलेल्या समाजसेवक दिपा ललित कासट कोणत्याही पदाची लालसा न करता सतत समाजकार्यात असलेल्या दीपा ललित कासट यांनी नगरसेवक साठी भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मागितली परंतु भाजपातील अंतर्गत मतभेदामुळे दीपा ललित कासट यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी नवीन पॅनल तयार करून निवडणुकीला सामोरे जाऊन प्रचारात जोरदार आघाडी घेतलेली आहे.
दीपा ललित कासट यांनी कॉर्नर सभा आणि गृहभेटीवर जोर दिला आहे. जवळपास पंधरा सोळा दिवसापासून सुरू असलेल्या त्यांच्या प्रचार रंगात आल्याने विरोधकांना चांगली धडकी बसली आहे
पक्षातील अंतर्गत राजकारणाच्या बळी ठरलेल्या दीपा ललित कासट यांना लोकांच्या चांगला प्रतिसाद मिळत आहे अनेक सामाजिक संघटना त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत.
रोज सकाळपासून ते रात्रीपर्यंत कॉर्नर सभा आणि गृहभेटी सुरू आहे. एकोरी वॉर्ड . नेहरू शाळे मागील परिसर. रहमत नगर. दर्गा वॉर्ड. पंचशील वॉर्ड हा संपूर्ण परिसर मागील पंधरा दिवसापासून पिंजून काढला.
गेल्या काही वर्षापासून सामान्य समाजसेवक म्हणून वावरताना नागरिकांच्या सुखद आणि दुःखद घटनांमध्ये सहभागी होऊन कामे केली. त्यामुळे दीपा ललित कासट यांना प्रभागातून सर्वत्र मिळत असलेल्या पाठिंब्याने विरोधकाची भंबेरी उडयाल्यांचे पाहायला मिळत आहे












