चंद्रपूर :- चंद्रपूर शहरान आज तापमानाचा उच्चांक गाठला. 43.2 अंश तापमानाची नोंद झाली आहे. राज्यातील हे सर्वाधिक तापमान ठरले. शहराची जगात सर्वाधिक उष्ण शहर म्हणून ओळख आहे. चंद्रपूरचं तापमान सतत वाढीवर आहे. एप्रिल महिन्यातच तापमानाचा आकडा 43.2 गाठला आहे. बुधवारचे तापमान 42.2 होते, तीन दिवसात 4 अंशाने तापमानात वाढ झाली आहे. तापमानाचा हा वाढता पारा येत्या काही दिवसांत आणखी वाढण्याची शक्यता आहे. एप्रिलमध्येच हे हाल आहेत, तर पुढच्या महिन्यात पारा कितीवर जाईल, याचा विचारच घाम फोडणारा आहे. High temperature in chandrapur
मार्च महिना लोटल्यानंतरही चंद्रपूरचा खास उन्हाळा सुरू झालेला नव्हता. ठराविक अंतराने येणारी वादळे -अवकाळी पाऊस यामुळे चंद्रपूरचा पारा 35 डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहिला. मात्र मंगळवारी अचानक यात वाढ झाली 41.8 असे उच्चांकी तापमान नोंदवत चंद्रपूर देशातील सर्वाधिक उष्ण शहर म्हणून गणले गेले. मंगळवार 41, बुधवार 42 आणि आता गुरुवारी तापमानाने उच्चांक गाठत 43 डिग्री च्या वर गेले आहे. Record temperature
चंद्रपुरात पारा वाढू लागल्यानंतर नागरिकांनी उष्णतेपासून स्वतःची काळजी घेण्यासाठी खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. शहराच्या विविध भागात दुपारी बारा ते तीन शुकशुकाट दिसू लागला असून नागरिकांनी शीतपेये- उसाचा रस यासह लिंबू पाण्याचा आधार घेणे सुरू केले आहे. दुपारच्या काळात उष्णतेमुळे कुठलीही काम केली जात नसल्याचे स्पष्ट झाले असून घराबाहेर पडायचे झाल्यास चेहरा व अंग झाकून घेत बाहेर पडावे लागत आहे. Hot city chandrapur
चंद्रपूर - मुल तालुक्यातील गोलाभुज येथील रहिवासी खुशाल सुरेश गेडाम यांच्या आयुष्यातील संघर्षाची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. लहान वयातच आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या या...
चंद्रपूर : महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक-2026 अंतर्गत वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने अरुण लखाणी यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली...
चंद्रपूर शहरातील रहमतनगर परिसरात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत (रेशन) मिळणाऱ्या सरकारी धान्याचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. शासनाकडून गरीब...
चंद्रपूर शहरालगत असलेल्या शिवनी चोर रेती घाटावर सध्या रेती तस्करांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, या संपूर्ण प्रकाराकडे महसूल व पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत...