विद्यार्थीनीवर अत्याचारप्रकरणी संस्था अध्यक्ष मुख्याध्यापकासह चार जणांवर गुन्हे दाखल

69

चंद्रपूर शहरातील एका मूकबधित विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार प्राकरणात मुख्य सूत्रधार केअरटेकरसह शाळेचे मुख्याध्यापक, संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव अशा चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये संस्थेचे अध्यक्ष अनंत लहामगे, सचिव जयेश वऱ्हाडे, मुख्याध्यापक कालिदास बल्की आणि केअर टेकर अजय वैरागडे यांचा समावेश आहे. लहामगे यांच्या संस्थेद्वारे शहरात मूकबधिर विद्यालय चालविले जाते. या विद्यालयात मुलांसह मुलीही शिक्षण घेत आहे. दरम्यान, एका १४ वर्षीय मुलीचे ऑक्टोबर महिन्यापासून केअर टेकर म्हणून असलेला अजय वैरागडे हा शारीरिक शोषण करीत होता. पीडित मुलीने हा प्रकार शिक्षिकेला सांगितल्यानंतर शिक्षिकेने मुख्याध्यापकसह संस्थेचे अध्यक्ष, सचिवांना याबाबत माहिती दिली. परंतु, मुख्याध्यापक आणि संस्थेने शिक्षिकेच्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाही. परिणामी अजय वैरागडे याच्याकडून अल्पवयीन विद्यार्थीनीचे शोषण सुरूच असल्याने काही शिक्षकांनी शहर पोलीस ठाणे गाठून घटनेची तक्रार दिली. तक्रारीवरून अजय वैरागडे यांच्यासह मुख्याध्यापक आणि संस्थेच्या अध्यक्ष, सचिवावरही बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच ॲट्रोसिटी ॲक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव व पोलिस निरीक्षक प्रभावती ऐकुरके करीत आहे.

bottom