भादुर्णीत शेतकरी ठार,आंबोलीत महिला जखमी
वाघ, बिबट्याचा हल्ला; सिंदेवाही, मूल तालुक्यातील घटना
तेंदुपाने तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले, तर शेतात काम करीत असलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले. पहिली घटना मूल तालुक्यातील भादुर्णी तर दुसरी घटना सिंदेवाही उपवन क्षेत्रातील आंबोली येथे घडली. ही घटना आज गुरुवारी घडली. मृत शेतकऱ्याचे नाव तुळशीदास सुरेश सोनुले (वय ३५ रा. रत्नापूर) असे आहे आहे तर बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव अर्चना भास्कर लोखंडे (वय ४६ रा. खाती मोहल्ला सिंदेवाही) असे आहे.












