वन विकास महामंडळाचे सहा अधिकारी कर्मचारी निलंबित , वन विभागात मोठी खळबळ

62

 

कर्तव्यात कसूर ठेवल्याचा ठपका ठेवीत चंद्रपूर वन विकास महामंडळाने (fdcm ) वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक आणि वन मजूर अशा सहा कर्मचाऱ्यावर निलंबनाची कार्यवाही केली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील पांडुरंग आत्राम, वनपाल विपुल संभाजी आत्राम, उमेश प्रल्हाद डाखोरे,नेताजी मोहन बोराडे,वनरक्षक प्राची देवकुमार चुनारकर, वनमजूर किशोर हिरामण गेडाम अशी निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. चंद्रपूर वन विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या मामला वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक 412 मध्ये वृक्ष कटाई झाली. कटाई केलेला माल आरोपीकडून जप्त करण्यात आला. जप्त केलेला माल आरोपीलाच विकण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र असा कोणताही उल्लेख या पत्रात नाही. कोणी या निलंबनाचे कारण सांगण्यास तयार नाही. तरी वन विकास महामंडळाने केलेली ही कार्यवाही जिल्हातील मोठी कार्यवाही ठरली आहे. या कार्यवाहीने वन विकास महामंडळ आणि वन विभागात एकच खळबळ उडाली आहे.

bottom