चंद्रपूर : सामाजिक कार्यकर्ते गौतम नागदेवते यांचा पुढाकार — खड्डेमुक्त चंद्रपूरचा निर्धार!

28

चंद्रपूर शहरातील रस्त्यांची अवस्था अक्षरशः नरक यातनेपेक्षा कमी नाही अशी झाली आहे. रस्त्यांवरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नेहमीच अपघात होत असून वाहनचालकांसोबतच पादचाऱ्यांनाही जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. मात्र या गंभीर प्रश्नाकडे प्रशासन मात्र डोळेझाक करत असल्याचे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर चंद्रपूरातील सामाजिक कार्यकर्ते गौतम नागदेवते यांनी पुढाकार घेत, आपल्या सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत स्वखर्चाने रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचा प्रशंसनीय उपक्रम सुरू केला आहे. शहरातील विविध भागांतील रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये त्यांनी स्वतः सिमेंट काँक्रीट टाकून दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.
या उपक्रमामुळे अपघातांची संख्या कमी होईल आणि नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. जे काम प्रशासनाने करायला हवे होते, ते काम आता एका सामाजिक कार्यकर्त्याकडून होत असल्याने गौतम नागदेवतेयांच्या या कार्याचे शहरवासीयांकडून भरभरून कौतुक केले जात आहे.गौतम नागदेवते यांनी सांगितले की, “प्रशासनाकडे वारंवार विनंत्या करूनही काहीच होत नाही. म्हणूनच आम्ही नागरिकांनीच पुढे येऊन आपले शहर स्वच्छ, सुरक्षित आणि खड्डेमुक्त करणे गरजेचे आहे.”चंद्रपूरकरांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित या महत्त्वाच्या प्रश्नावर नागदेवते यांच्या संवेदनशील पुढाकाराने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की, खरा बदल जनतेच्या सहभागातूनच घडू शकतो.

bottom