तब्बल चार वर्षांपासून रखडलेली जिल्हा परिषद निवडणूक आता अखेर होण्याच्या मार्गावर आली आहे. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी राखीव असलेले नकोडा-माडा जिल्हा परिषद क्षेत्र यावेळी ओबीसी खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. यामुळे या मतदारसंघात वेगळीच राजकीय चुरस निर्माण झाली आहे.या क्षेत्रातून भाजपचे कार्यकर्ते आणि पिपरी येथील बाजार समितीचे संचालक पारस पिंपळकर यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा सध्या जोरात आहे. सामाजिक कार्यात सदैव पुढे असलेले पारस पिंपळकर हे शेतकऱ्यांच्या अडचणी आणि गावातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांबाबत नेहमीच सक्रिय राहिले आहेत.भारतीय जनता पक्षातील प्रामाणिक, मेहनती आणि जनसंपर्कात तत्पर कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. आपल्या कामातून आणि विकास उपक्रमांद्वारे त्यांनी मतदारसंघात एक सकारात्मक छाप पाडली आहे.
याच पार्श्वभूमीवर नकोडा-माडा परिसरात पारस पिंपळकर यांच्याबाबत जनतेत उत्सुकता निर्माण झाली असून, येत्या निवडणुकीत ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून विजयी होतील, अशी चर्चा स्थानिक स्तरावर जोर धरत आहे.सामाजिक बांधिलकी, विकासदृष्टी आणि सर्वसमावेशक विचारसरणीमुळे पिंपळकर यांच्याकडून मतदारांना मोठ्या अपेक्षा आहेत.












