चंद्रपूर
एकीकडे भव्यदिव्य अश्या 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या आज उद्घाटन सोहळा होत असताना आम आदमी पक्ष्याचे कार्यकर्ते मात्र रस्त्यावर उतरले होते.मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री यांचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हातात फलक घेतले.मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री यायच्या आधीच पोलिसांनी आपच्या पंधरा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.चंद्रपूर शहरातील बल्लारशाह बायपास महामार्गावरील अष्टभूजा बाबूपेठ मध्यभागी असलेल्या रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम पाच ते सहा वर्षांपासून रखडले आहे.याकडे प्रशासन लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत असल्यानं आपने आज मुख्यमंत्र्यांच्या लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.
चंद्रपूर शहरातील बल्लारशाह बायपास महामार्गावरील अष्टभूजा बाबूपेठ मध्यभागी असलेल्या रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम पाच ते सहा वर्षांपासून रखडले आहे. यामुळ या ठिकाणी अनेक अपघात झालेत.प्रवाश्यांचे बळी गेले आहेत.दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात चार निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला होता.या प्रश्नाकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.कार्यकर्त्यांनी निदर्शने केलीत. आपचा आंदोलनाची चाहूल लागतात पोलिसांनी पंधरा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.आपचे जिल्हाध्यक्ष राजू कुडे म्हणाले, सदर ब्रिजचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी वरोरा-चंद्रपूर-बल्लारपूर टोल रोड (WCBTRL) कंपनीची आहे. मात्र, कंपनीने याकडे कायमचेच दुर्लक्ष केले. बांधकाम विभागाने देखील कंपनीवर वेळेवर कार्यवाही केली नाही, असा आरोप त्यांनी केला.या विरोधात आम आदमी पार्टीने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि रामनगर पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे. मात्र, अद्याप दोषींवर कार्यवाही झाली नसल्याची माहिती कुडे यांनी दिली.
मागण्या दहा दिवसांत पूर्ण न झाल्यास आम आदमी पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कुडे यांनी दिला आहे
आपचे नेते सुनील मुसळे, जिल्हा अध्यक्ष मयूर राईकवार,युवा जिल्हा अध्यक्ष राजू कुडे, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे,जिल्हा संघटन मंत्री नागेश्वर गंडलेवर, जिला उपाध्यक्ष योगेश मुऱ्हेकर जिल्हा सचिव राजकुमार नागळाले, प्रशांत शिदूरकर, संतोष बोपचे, ज्योती बाबरे, तब्बसूम शेख, अशोक माहूरकर, अश्रफ शेख, शगीर सय्यद, सिकेंदर सागोरे, सुनील सदभय्या, सुजित चेडगूलवार, अनुप तेलतूमडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आले.












