देखाव्यापेक्षा सुविधाकडे लक्ष द्यायला हवं होतं …! खेळाडूचा मालवाहतूक करणाऱ्या वाहनातून प्रवास

157

चंद्रपूर

बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे 67 व्या राष्ट्रीय मैदानी क्रीडा स्पर्धेचे उदघाटन झालं.या सोहळ्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पर्धेच्या अभूतपूर्व आयोजनाची स्तुती केली. मात्र हा केवळ देखावा होता, हे काही वेळातच दिसून आलं.कार्यक्रम संपताच ज्या खेळाडूना मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री यांच्यापुढे सन्मान दिला गेला. त्याच खेळाडूना माल वाहतूक करणाऱ्या वाहनातून प्रवास करावा लागला. देखाव्यापेक्षा सुविधांकडे अधिक लक्ष द्यायला हवं होतं,अश्या प्रतिक्रिया आता समाजमाध्यमातून उमटत आहेत. ही स्पर्धा खेळाडूंच्या सन्मानासाठी होती की राजकीय नेत्यांचा प्रसिद्धीसाठी, असे प्रश्न आता समाजमाध्यमात उपस्थित केले जात आहेत.

बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे 67 व्या राष्ट्रीय मैदानी क्रीडा स्पर्धेचे उदघाटन 27 डिसेंम्बरला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी स्पर्धेच्या अभूतपूर्व आयोजनाबद्दल भरभरून कौतुक केले.क्रीडा मंत्री संजय बनसोडे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आंतरराष्ट्रीय धावपटू हिमा दास, पद्मश्री बहाद्दूर सिंग चव्हाण, ललिता बाबर, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन आदींची उपस्थिती होती.सोहळा भव्यदिव्य असा होता.या सोहळ्यात राजकीय नेत्यांचे भाषण लांबच लांब झाले. यामुळं उपस्थित वैतागले.काही खेळाडू बाहेर जाण्यासाठी निघालेत मात्र त्यांना बाऊन्सरनी अडवीलं, अशी चर्चा आहे.हा प्रकार नक्कीच शोभनीय नाही.खरंतर ही स्पर्धा खेळाडूंच्या सन्मानासाठी आणि नव्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी होती. मात्र घडलं उलटचं.कार्यक्रम संपल्यावर खेळाडूंना चक्क माल वाहतूक करणाऱ्या वाहनातुन नेण्यात आले. तसे फोटो समाजमाध्यमात वायरल झाले आहेत. या प्रकारावरही आता संताप व्यक्त केला जात आहे.

bottom