रेती घाटावर सरपंच, तमूस अध्यक्षाना मारहाण : महिलांना धक्काबुक्की : गोंडपीपरी तालुक्यातील घटना : तिघांवर गुन्हा दाखल

141

चंद्रपूर

रेती घाटावर गेलेल्या सरपंच, तमुस अध्यक्षाला बेदम मारहाण झाली. उपस्थित असलेल्या महिलांनाही धक्काबुक्की करण्यात आली. ही घटना गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा येथे बुधवारचा मध्यरात्री घडली.तरुण गंगाराम उमरे,चंद्रशेखर सुधाकर लखमापुरे अशी जखमीची नावे आहेत.जखमीना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.पोलिसांनी तिघांवार गुन्हा दाखल केला आहे.यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.तर एक आरोपी फरार आहे.

प्राप्त माहिती नुसार, गोंडपिपरी तालुक्यात अंधारी नदीवरील कुलथा घाटातुन रेतीचा उपसा सुरु आहे.रात्रबेरात्र येथून जेसीपी आणि पोकलेन मशीनच्या माध्यमातून रेतीचा उपसा केला जातो. रात्रभर सुरू असलेल्या या प्रकारामुळे गावकऱ्यांना मोठाच मनस्ताप सहन करावा लागतो.
अश्यात बुधवारचा मध्यरात्री रेतीचा उपसा सुरु असताना तारडा गावचे सरपंच तरुण उमरे,तमुस अध्यक्ष चंद्रशेखर लखमापुरे यांच्यासह काही महिला रेती घाटावर गेल्यात.घाटावर स्वप्निल काशीकर, सय्यद,वैभव पेनसे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.दोघात शाब्दिक वादावादीझाली .मात्र काही वेळातच वादावादीचे रूपांतर मारहानीत झाले. लोखंडी रॉड,धारधार शस्त्रांनी घाटावर गेलेल्या सरपंच, तमूस अध्यक्षा मारहाण करण्यात आली. तर महिलांनाही धक्काबुकी करण्यात आली.घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले.सय्यद,वैभव पेनचे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.स्वप्निल काशीकर हा घटना स्थळावरून फरार झाला आहे.या तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.पुढील तपास ठाणेदार जीवन राजगुरू, पीएसआय मोगरे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

कार्यकर्तेच चोर…

गोंडपिपरी तालुक्यात दर्जेदार रेतीचे अनेक घाट आहेत. या रेतीला सोन्याचा भाव मिळतो. विविध घाटातून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी केल्या जाते. यापूर्वी चोरीच्या घटनेत पकडल्या गेलेल्या बहुतांश ट्रॅक्टर राजकीय कार्यकर्त्यांच्याच नावावर होत्या. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन येते रे तिची मोठी लूट सुरू आहे.

bottom