चंद्रपूर शहरातील रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे मनसे कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षांवर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच आज सकाळी बल्लारपूर बसस्थानक परिसरात एका कापड व्यवसायिकावर गोळीबार करण्यात आला.
या हल्ल्यात कापड व्यवसायिक सुदैवाने बचावले. मात्र त्यांच्या नोकराच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झाले आहेत. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना नेमकी कोणत्या कारणातून घडली, याचा शोध बल्लारपूर पोलीस घेत आहे. अज्ञात हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळतात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली












