आमच्या अनुताईला उमेदवारी द्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा आग्रह, निवेदनातून केली मागणी

63

 

शहरातील कोणतिही समस्या असो अनुताईंची धाव ठरलेली असते. त्यानंतर अनुताई ती समस्या कायमची सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करतात. वेळप्रसंगी आंदोलनही करतात. हा प्रकार मागील २० वर्षांपासून अविरत सुरू आहे. यातून अडचणीत सापडलेल्या चंद्रपूरकरांची पावले अनुताईंच्या घराकडे हक्काने धाव घेतात. यामुळे प्रत्येकांच्या तोंडी अनुताई बघायला मिळतात. चंद्रपूर विधानसभा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. यामुळे या निवडणुकीत अनुताईंना उमेदवारी देण्यात यावी यासाठी खुद्द काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात कार्यकर्त्यांनी शहर जिल्हाध्यक्षांकडे निवेदनही सादर केले आहे.अनुताई दहेगावकर या मागील २० वर्षांपासून काँग्रेस पक्षात सक्रिय काम करीत आहेत. चंद्रपूर शहर महिला अध्यक्ष, जिल्हा महिला काँग्रेस कमिटी सचिव, जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी यापूर्वी जबाबदारी सांभाळली आहे. आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग सचिव या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली धम्म चक्र अनुवर्तन दिन धम्मदीक्षेला ५० वर्षे पूर्ण झाल्यावर मोठ्या आंबेडकरी जनतेच्या उपस्थित भव्य कार्यक्रम घेण्यात आला. यासोबतच माता रमाई भीमराव आंबेडकर राज्यस्तरीय महिला परिषद, राजर्षी शाहू महाराज परिषदेचेही यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

२०२२ मध्ये संविधान दिनाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. २० ऑक्टोबर २०२३ ला दीक्षाभूमी चंद्रपूर येथे धम्मचक्र दिनानिमित्त प्रसिद्ध बुद्ध-भीम गीत गायिका कडुबाई खरात यांचा गीतांच्या कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाला हजारो जनतेनी उत्फूर्त प्रतिसाद दिला. अनुताई दहेगावकर यांनी पक्षांतर्गत अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच अनेक आंदोलनाचे नेतृत्वही केले. महिलांच्या आर्थिक विकासासाठी प्रबोधिनी नागरी सहकारी पत संस्था स्थापन केली. या माध्यमातून अनेक गरजू महिलांना आर्थिक मदत केली. रोजगार उपलब्ध करून देत सन्मानाणे जीवन जगण्याचा मार्ग दाखविला.
सर्वच क्षेत्रात अनुताईंनी आपल्या कार्याची छाप सोडली आहे. यामुळे या निवडणुकीत त्यांना काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी रवी भिसे, विजय धोबे, विजय पोहनकर, सचिन रामटेके, मतीन कुरेशी, शालिनीताई भगत, ईजाज कुरेशी, बबलू कुरेशी, रेखा बारसागडे, सुवर्णा खोब्रागडे, कपिला मेश्राम, वंदना वाघमारे, अनिता दातार, समुद्रा बोरकर, शालिनी लाडे, वंदना बांबोडे, वनिता भागवत, रिना रायपुरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी केली आहे.

bottom