कर्तृत्ववान जनसेवक दीपक जयस्वाल यांचा प्रभाव – एकोरी प्रभागात पुन्हा विजयाचा गुलाल उधळणार

30

कर्तृत्ववान जनसेवक दीपक जयस्वाल यांचा प्रभाव – एकोरी प्रभागात पुन्हा विजयाचा गुलाल उधळणार

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या एकोरी प्रभागाचे माजी नगरसेवक दीपक जयस्वाल हे आपल्या कर्तुत्ववान शैली, दिलखुलास व्यक्तिमत्त्व आणि प्रामाणिक कामकाजासाठी शहरात विशेष ओळखले जातात. सामान्य नागरिकांना आपलंसं करून घेण्याची त्यांची आगळीवेगळी शैली, सर्वांशी साधलेला थेट संपर्क आणि प्रभागातील प्रश्न सोडविण्याची तत्परता यामुळे जयस्वाल हे नागरिकांच्या मनात खास स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहेत.मागील अनेक वर्षांपासून एकोरी प्रभागाचे नेतृत्व करताना त्यांनी सामान्य जनतेच्या अडचणींना स्वतःचे प्रश्न मानून त्यांच्या सोडवणुकीसाठी सातत्याने प्रयत्न केले. नाली-गटार, पाणीपुरवठा, वीज, रस्ते आदी मूलभूत सुविधांपासून ते शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांपर्यंत प्रत्येक क्षेत्रात दीपक जयस्वाल यांनी प्रभागात लक्षणीय कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे, प्रभागातील प्रत्येक कुटुंबाशी त्यांनी वैयक्तिक ओळख ठेवत संवाद साधला आहे.या प्रभागात विकासाचा नवा अध्याय लिहिणारे जयस्वाल यांना नागरिकांचा ठाम विश्वास व पाठिंबा लाभला असून, येणाऱ्या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चीत मानला जात आहे. विरोधक कितीही कांगावा करोत किंवा टीका करोत, तरीही नागरिकांना माहीत आहे की त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारे नेतृत्व केवळ दीपक जयस्वालच आहेत.जयस्वाल यांच्या काम करण्याच्या जमीनीवरच्या पद्धतीमुळेच एकोरी प्रभागात “विकास आणि जनसंपर्क” ही ओळख दृढ झाली आहे. नागरिकांच्या समस्या अभ्यासपूर्वक ऐकून त्यांचे निराकरण करण्याची त्यांची तत्परता, सामाजिक बांधिलकी आणि सर्वांशी नम्रतेने वागण्याची त्यांची पद्धत हीच त्यांची खरी ताकद ठरत आहे.एकोरी प्रभागातील मतदार आज ठामपणे म्हणत आहेत – “आमच्या प्रभागाच्या प्रगतीसाठी दीपक जयस्वालच हवेत.”

bottom