राजुरा पोलिस स्टेशन हद्दीत कोळशाच्या तस्करीला ऊत; पोलिसांच्या अलिखित परवानगीचा संशय

43

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुन्हा एकदा कोळशाच्या तस्करीने डोके वर काढले आहे. विशेषतः येथील वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) च्या खाणींमध्ये ही तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे बोलल्या जात आहे आहे. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या ‘अलिखित परवानगी’ मुळेच कोळसा तस्करांचा मनोबल वाढला असून, त्यांनी पुन्हा बाजारपेठेत चोरीच्या कोळसा खुलेआम विकण्यास सुरुवात केली आहे.
मध्यंतरी पोलिसांच्या कारवाईनंतर कोळसा तस्करीवर मोठ्या प्रमाणावर आळा घालण्यात आला होता. मात्र सध्या या कारवायांना ब्रेक लागल्याचे चित्र असून, पुन्हा एकदा कोळसा तस्कर सक्रिय झाले आहेत. डब्लू सी एल येथून कोळशाचे ट्रक भरून खुलेआम वाहतूक होत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.या तस्करीमागे काही पोलिसांचा आशीर्वाद असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे

bottom